नविन जिल्हाधिकारी यादव लवकरच रुजू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:31 IST2020-04-08T22:31:16+5:302020-04-08T22:31:44+5:30
गंगाथरन डी यांनी चार्ज सोडला : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची तडकाफडकी बदलीचे आदेश बुधवारी येऊन धडकले. त्यानंतर तेवढ्याच तडकाफडकीने बुधवारी सकाळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे त्यांनी पदभार सोपविला़ चार्ज सोडल्यानंतर ते वसई विरार महानगरपालिका आयुक्तपदी रुजू होणार आहेत़ दरम्यान, प्रवासाचे नियोजन करुन दोन ते तीन दिवसात रुजु होईल, अशी माहिती नविन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लोकमतला दिली़
धुळ्याचे नविन जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नविन जिल्हाधिकारी येत्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान रुजु होतील. दरम्यान, विद्यमान जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षे सेवा याचठिकाणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना सहा महिने झाले असतानाच गेल्या महिन्यात त्यांची बदली करण्यात आली़ त्यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करुन त्वरीत वसई विरार मनपा आयुक्तपदी रुजु व्हावे असे आदेश होते़ परंतु त्यांनी शासनाकडून मुदत मागितली होती़ शिवाय विधानपरिषदेची निवडणूक देखील होती़ कोरोनामुळे निवडणूकपुढे ढकलण्यात आली़ त्यानंतर लॉकडाऊनमुळे त्यांची बदली अजून लांबले असे वाटत असतांनाच बुधवारी सकाळी त्यांना पद्भार सोडण्याचे आदेश अप्पर मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी दिले आहेत़ नवीन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी येत्या दोन ते तीन दिवासात रुजु होईल, अशी माहिती भ्रमणध्वनीवरुन ‘लोकमत’ला दिली़