दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी मुख्य वैद्यकीय अधीक्षकांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:46 IST2017-09-21T12:46:02+5:302017-09-21T12:46:39+5:30
चार वैद्यकीय अधिका:यांवर मदार; उपकरणे धुळखात

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी मुख्य वैद्यकीय अधीक्षकांची गरज
ऑनलाईन लोकमत
दोंडाईचा, जि. धुळे, दि. 21 - येथे सर्वसामान्य रुग्णांसाठी उभारलेल्या  दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी  मुख्य वैद्यकीय अधीक्षकांच्या नेमणुकीबाबत  नाशिक आरोग्य उपसंचालक उदासीन असतानाच वषानुवर्षे चार वैद्यकीय अधिका:यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडत असल्याचे दिसते.
 दोंडाईचात      साधारणत:   पंधरा वर्षापूर्वी  जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयात विविध  46 पदे मंजूर आहेत. या  उपजिल्हा रुग्णालयात एक मुख्य वैद्यकीय अधीक्षक  व इतर सात वैद्यकीय अधिकारी यांची मंजुरी आहे. परंतु रुग्णांवर उपचार करणारे  वैद्यकीय अधिकारी यांची वषानुवर्षे कमतरता आहे. सद्यपरिस्थितीत  मुख्य वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिका:यांची कमतरता आहे. 46 पैकी 16 पदांची कमतरता आहे.
डॉ.एल.बी. चंद्रे यांच्याकडे तात्पुरता  वैद्यकीय अधीक्षकाचा कार्यभार दिला आहे. तर डॉ.एस.एस. पारख, डॉ.ए.डी. भामरे, डॉ.जे.आर. ठाकूर, डॉ.नेहा पारख आदींवर रुग्णालयाची मदार आहे. तात्पुरती नेमणूक असल्याने कर्मचारी वर्गावर  पाहिजे तसा अंकुश नाही.
वैद्यकीय अधिका:याची कमतरता असतानाच एक कनिष्ठ लिपिक, अधिपारीचारीका  अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत.  अस्थीतज्ञ, हृदयरोग, बालरोग, दंत रोगतज्ञ नाहीत. सहाययक अधिसेविका, परिचारिका, अधिपरीचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, शिपाई, कक्ष सेवक, शस्रक्रिया कर्मचारी व सफाई कामगार  यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेत. भूलतज्ज्ञ नसल्याने कोणतीही शस्रक्रिया होत नाही. त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा  कोणताही फायदा गरिबांना होत नाही. त्यामुळे पदरमोड करून रुग्णांना धुळे येथे जावे लागते. अपू:या वैद्यकीय अधिका:यांमूळे रुग्णावर पुरेसे उपचार होत नाहीत. रुग्णालयात अत्यंत महागडी  वैद्यकीय उपकरणे आहेत. ती हाताळण्यास पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ती उपकरणे नादुरुस्त किंवा वापरा अभावी  बंद खोलीत धूळ खात पडली आहेत. सिव्हील सर्जन व नाशिकच्या  आरोग्य उपसंचालकडे उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी करूनही  अद्यापही पुरेसे  वैद्यकीय  अधिकारी  यांची नेमणुक झाली नाही. त्यामुळे रुग्णात नाराजी  जानवते. कायमस्वरूपी महिला वैद्यकीय अधिकारी  नसल्याने महिलांचा  आरोग्य विषयक समस्या सोडण्यास अडचण येते.  स्त्री रोगतज्ञ  नसल्याने   येथे तपासणी होत नाही.  त्यामुळे पीडितास  धुळे येथे पाठवावे लागते.  महिला व पुरुष शस्त्रक्रियाही जेमतेम होतात.
हृदय रोगतज्ञ, अस्थीतज्ञ नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार करणेसाठी धुळे येथे पाठवावे लागते .त्यामुळे अनेकदा रुग्ण मरण पावल्याचे दिसते .जीवावर बेतते. 
सफाई कामगारांची  वानवा असल्याने अस्वच्छता दिसते. रुग्णालयात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी आहे.रुग्णालयात पिण्याचा पाण्याची व पुरेशा  औषधाची सोय आहे. उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी  यांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
दवाखान्यात फक्त दोन तास रुग्ण तपासले जातात. दवाखाना स्वच्छ असावा. सर्व वैद्यकीय अधीकारी नेमून सर्व ऑपरेशन व्हावेत. काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सयाजीराव दिसतात. ते नियमित यावेत.
- सुनीता परदेशी,  रुग्ण
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधीक्षकांची व इतर वैद्यकीय अधिकारी  नेमणूक करण्यासाठी  वरिष्ठां कडून प्रय} होत आहेत.
- ललित चंद्रे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय