जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी प्रत्येक पिढीमध्ये संस्कारांची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:58+5:302021-03-26T04:35:58+5:30
कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर यांच्या प्राणीशास्त्र विभागाच्या ...

जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी प्रत्येक पिढीमध्ये संस्कारांची आवश्यकता
कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर यांच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पक्षी संवर्धन व पक्षी निरीक्षण कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पिं. ए. सो. चे अध्यक्ष आर. एन. शिंदे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षितज्ज्ञ अनिल रतिलाल माळी (नाशिक), तसेच प्रो. डॉ. एस. एस. पाटोळे (साक्री), प्रा. डॉ. एल. बी. पवार (साक्री), प्रा. डॉ. एस. डी. पगारे (सटाणा), प्रा. डॉ. जे. डी. वसाईत (मालेगाव), प्रा. डॉ. एच. आय. शेख (कुसुंबा), प्रा. डी. एस. पाटील (नंदुरबार), प्रा. जे. पी. अमृतकर (नाशिक) हे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सोनवणे म्हणाले, सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यप्राणी हा अत्यंत स्वार्थी आहे. निसर्गामध्ये पक्ष्यांचे महत्त्व हे अद्वितीय असून परागीभवनात, अन्नसाखळीत तर ते जीवो जीवस्य जीवनम् यावर आधारित आहे.
अनिल माळी म्हणाले, की पक्षी निरीक्षण हा छंद आहे. तो चार भिंतींमध्ये जोपासला जाऊ शकत नाही.
संस्थेचे अध्यक्ष आर. एन. शिंदे म्हणाले, की पक्ष्यांच्या शिकारीस आळा घालणे, प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर / छपरावर कृत्रिम घरटी ठेवून त्यात पक्ष्यांसाठी धान्य ठेवावे, तसेच मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्यांची पाण्याची सोय होईल.
याप्रसंगी प्रो. डॉ. एस. एस. पाटोळे (साक्री) व प्रा. डी. एस. पाटील (नंदुरबार) यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. सी. मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय खोडके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वाय. एम. नांद्रे यांनी केले. या कार्यक्रमास साक्री, सटाणा, मालेगाव, कुसुंबा, नंदुरबार आणि पिंपळनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.