पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:36 IST2020-06-20T20:35:45+5:302020-06-20T20:36:04+5:30
भाकप । प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

dhule
धुळे : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी निषध आंदोलन करण्यात आले़ धुळे जिल्ह्यातही हे आंदोलन झाले़ प्रशासनाला निवेदन देण्यात आले़
भारतीय कम्युनीस्ट पक्षाचे जिल्हा सेके्रटरी अॅड़ हिरालाल सापे, तालुका सेके्रटरी अॅड़ संतोष पाटील, सल्लागार अॅड़ मदन परदेशी, कौन्सिल सदस्य कॉ़ अर्जून कोळी, कॉ़ प्रमोद पाटील, कॉ़ छोटू देवरे यांच्या शिष्टमंडळाने शिरपूर येथे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी असताना देखील इंधनाचे दर कडाडले आहेत़ दिवसेंदिवस दरवाढ होत असल्याने सामान्यांने कंबरडे मोडले आहे़ केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या विरोधात देशभरात निषेध दिन पाळण्यात आला़
पेट्रोल, डिझेलचे दर त्वरीत कमी करावे, चंद्रपूर जिल्ह्यातील भाकप कार्यकर्ते विनोद झोडगे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, शिरपूर तालुक्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या, परंतु बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्वरीत पिक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना खतांचा मुबलक पुरवठा करावा, खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई थांबवावी, काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करावी, शिरपूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार बंद करण्यासाठी उपाययोजना करावी, १७ मार्चला गारपीट आणि वादळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़