विधि महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:19+5:302021-08-29T04:34:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधि महाविद्यालयात ‘माहिती तंत्रज्ञान युगातील वाचनालयाचे महत्त्व’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ...

विधि महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधि महाविद्यालयात ‘माहिती तंत्रज्ञान युगातील वाचनालयाचे महत्त्व’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष महेंद्र निळे अध्यक्षस्थानी होते. साधन व्यक्ती म्हणून उत्तर प्रदेशचे डॉ. राज कुमार सिंग, झेड.बी. पाटील महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. योगिता पाटील आदींची उपस्थिती होती. त्यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले की, आज आपण सर्व जण कोरोना महामारी प्रभावात अडकलाे असतानाही माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपली वाचनसंस्कृती जतन करू शकतो. आजकाल अनेक पुस्तके हे पीडीएफ फॉरमॅटमध्ये वाचकास उपलब्ध होऊ शकतात. अनेक वेबसाइटस् आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण अनेक पुस्तकांचा उपयोग करू शकतो, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजय बहिरम, समन्वयक ग्रंथपाल अतुल पाटील, सहसमन्वयक डॉ. वैभव सबनीस यांनी काम पाहिले.