राष्ट्रीय लोकअदालत धुळे जिल्ह्यात १० एप्रिलला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:23 IST2021-03-25T21:23:31+5:302021-03-25T21:23:42+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे प्रभारी सचिव यांची माहिती

राष्ट्रीय लोकअदालत धुळे जिल्ह्यात १० एप्रिलला होणार
धुळे : धुळे जिल्हयात १० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक न्यायालयात प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, वीज चोरी प्रकरणे तसेच भूसंपादने प्रकरणे ठेवण्यात येतील. वादपूर्व प्रकरणे ज्यामध्ये बँकेचे थकबाकी प्रकरणे, फायन्सास कंपनीची थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येतील़ न्यायालयात प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली, तर कोर्ट फी स्टॅम्प १०० टक्के परत मिळतो़ वेळ आणि पैसा वाचतो, सलोख्याचे, नातेसंबंध सुधारतात़ भविष्यात मिळणारा लाभ आजच मिळतो. प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीअंती निवाडा करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे प्रभारी सचिव तथा दिवाणी न्यायाधीश पी. एच. बनसोड यांनी कळविले आहे़