हिरे महाविद्यालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:08+5:302021-09-08T04:43:08+5:30
धुळे - येथील श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात आला. नेत्रशल्यचिकित्सा विभागाने ...

हिरे महाविद्यालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा
धुळे - येथील श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात आला. नेत्रशल्यचिकित्सा विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा पंधरवडा दरवर्षी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हिरे शासकीय महाविद्यालय येथील नेत्र विभागात अधिष्ठाता डॉ .पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धा, पथनाटय, चित्रकला स्पर्धा, सुविचार, काव्य आदी स्पर्धाचा ममावेश होता. तृतीय वर्षांचे वैद्यकीय विद्यार्थी, परिचर्या प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, आंतरवासिता करित असणारे विद्यार्थी तसेच नेत्र विभागातील इतर प्रशिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांनी सहभागी होऊन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नेत्रदानासंबंधी जागृती निर्माण व्हावी तसेच नेत्रदानासंबंधीच्या चुकीच्या संकल्पना दूर व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. पथनाट्याच्या माध्यमातून नेत्रदानाची माहिती देण्यात आली. तसेच नेत्रदानाचे महत्व सांगणारी कविता सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ अरुण मोरे, डॉ. नेत्र विभागप्रमुख डॉ. वैशाली उणे, वैधकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सुर्यवंशी, कोरोना नोडल अधिकारी तथा विषेश कार्य अधिकारी डॉ. दिपक शेजवळ, सहयोगी प्राध्यापक डॉ . मुकरम खान, डॉ चंदू थोरात, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती बागुल, मनोविकारशास्त्र विभागप्रमुख डॉ.जिबन पवार, बालरोगशास्त्र विभागप्रमुख
डॉ. नीता हटकर, डॉ.माया वसईकर , शरीरविकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ .अमिता रानडे, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ . पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ.दीपाली गबई, अंजनी खैरनार, डॉ.सौरभ जाधव, डॉ.सबा परवीन, डॉ . विजयश्री तोंडे व आंतर्वासिता डॉक्टरांनी परिश्रम घेतले.