मराठा सेवा संघाचे राष्टÑीय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:44 IST2020-02-04T22:44:20+5:302020-02-04T22:44:44+5:30
पत्रकार परिषद : बोरकुंड येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम

मराठा सेवा संघाचे राष्टÑीय अधिवेशन
धुळे : तालुक्यातील बोरकुंड येथे ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय ग्रामीण महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़ या दोन दिवसात विविध कार्यक्रम होणार आहेत़
८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बोरकुंड गावातून सम्राट बळीराजाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, देविदास सोनवणे, सेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन, सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे उपस्थित राहतील़ यानंतर सायंकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे हे राहतील़ दुपारी १२ वाजेदरम्यान प्रथम प्रबोधन सत्र होईल. यात मराठा समाजाचे प्रश्न आणि पुढील कृती आराखडा या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर दुपारी अडीच वाजता द्वितीय प्रबोधन सत्र पार पडेल. यात विचारवंत श्रीमंत माने (नाशिक), डॉ. दिपाली पानसरे (संगमनेर) व नाशिक जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा देशमुख हे सर्व मान्यवर महिलांचे शिक्षण व प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी ४ वाजेदरम्यान समारोप सत्र होणार आहे.