डिसेंबर महिन्यात धुळ्यात होणार राष्ट्रीय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 22:48 IST2019-11-10T22:48:07+5:302019-11-10T22:48:31+5:30
मराठा सेवा संघ : केंद्रीय कार्यकारिणी बैठकीचा समारोप, विविध विषयांवर झाली सविस्तर चर्चा

डिसेंबर महिन्यात धुळ्यात होणार राष्ट्रीय अधिवेशन
कापडणे : मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या धुळे येथील दोन दिवसीय बैठकीचा रविवारी समारोप झाला़ त्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटी धुळ्यात मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले़ याशिवाय बैठकीत विविध विषयांवर देखील चर्चा झाली़
धुळे येथील सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस शनिवारी धुळ्यात प्रारंभ झाला होता़ या दोन दिवसीय बैठकीचा समारोप रविवारी करण्यात आला़ या बैठकीस राज्यभरातून पदाधिकाºयांनी आपली उपस्थिती नोंदविली होती़
मराठा सेवा संघाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन महासचिव मधुकर मेहेकरे, कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके, उपाध्यक्ष अरविंद गावंडे, नाशिक जिल्हाध्यक्ष दीपक भदाणे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच सेवा संघाच्या ३३ कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आली. यात जिल्हानिहाय सभासद नोंदणी आढावा घेणे, धुळे येथे होणाºया नियोजित अधिवेशनासंदर्भात नियोजन करणे, सिंदखेडराजा येथे होणाºया जिजाऊ जन्मोत्सव-२०२० चे नियोजन करणे, मराठा विश्वभूषण पुरस्काराकरीता नावे निश्चित करणे, केडर कॅम्प आयोजित करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली़ तसेच धुळ्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे देखील ठरविण्यात आले़ या अधिवेशनात कशा प्रकारचे नियोजन असेल यावर देखील पदाधिकाºयांनी चर्चा केली़
या बैठकीसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, सचिव एस. एम. पाटील, कार्याध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष पी. एन. पाटील, सहसचिव सुनिल पवार, श्याम भदाणे, उद्योजक कक्षाचे अनंत पाटील, कोषाध्यक्ष प्रविण पाटील, प्रा. प्रेमचंद अहिरराव, प्रा. सदाशिव सुर्यवंशी, प्रशांत भदाणे, मिलन पाटील, तालुकाध्यक्ष भुषण पाटील, प्रविण पाटील, मनोज पाटील, रामकृष्ण पाटील, तालुका उपाध्यक्ष बी. एम. पाटील, प्रविण पाटील, सागर भदाणे, नितीन पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुलभा कुवर, विभागीय मार्गदर्शक डॉ़ उषा साळुंखे, विभागीय अध्यक्षा किरणताई नवले, जिल्हाध्यक्षा नूतन पाटील, सचिव वसुमती पाटील, जयश्री पाटील, मंगला सोनवणे आदी प्रयत्नशिल होते. विविध विषयावर चर्चा देखील करण्यात आली़
गुणवंतांचा झाला सन्मान
केंद्रीय कार्यकारिणी बैठकीचे औचित्यसाधून मराठा समाजातील गुणवंतांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला़ त्यात अनंत पाटील, धुळे येथील परिवर्तन विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश पाटील (कापडणे ता़ धुळे), आऱ ओ़ पाटील (नरडाणा ता़ शिंदखेडा), बाळासाहेब भदाणे (बोरकुंड ता़ धुळे), अमोल पाटील यांचा समावेश होता़