कापडण्याच्या लाईनमनचा नाशिकला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 10:05 IST2019-06-14T10:05:03+5:302019-06-14T10:05:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कापडणे : कापडणे येथील बोरसे गल्लीत राहणारा गणेश दगाजी पाटील (२७) याचा विद्युत पोलवर काम करत ...

Nashik death due to cloth | कापडण्याच्या लाईनमनचा नाशिकला मृत्यू

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : कापडणे येथील बोरसे गल्लीत राहणारा गणेश दगाजी पाटील (२७) याचा विद्युत पोलवर काम करत असताना मृत्यू झाला़ 
नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथील वीज वितरण कंपनीत लाईनमन या पदावर कार्यरत होता़ पिंपळगाव शेत शिवारात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलवर काम करत असताना त्याला शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्य ओढवला़ 
गणेश याचा दीड वर्षापुर्वीच विवाह झाला होता़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी रोहिणी आणि ९ महिन्याचा मुलगा, भाऊ, काका असा परिवार आहे़ कापडणे येथील वीज कंपनीच्या सबस्टेशनमध्ये त्याचा भाऊ चेतन हा लाईनमन म्हणून कार्यरत आहे़ गणेश याची अंत्ययात्रा १४ जून रोजी दुपारी कापडणे येथून निघणार आहे़ घटनेमुळे हळहळ व्यक्त झाली़ 

 

Web Title: Nashik death due to cloth

टॅग्स :Dhuleधुळे