६५ गुरे वाहून नेणारा ट्रक नरडाणा पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:19+5:302021-07-14T04:41:19+5:30

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील कलमाडी फाट्यावर नरडाणा पाेलिसांची तपासणी मोहीम सुरु होती. शिरपूरकडून धुळ्याकडे येणारा एमपी ०९ ...

Nardana police nabbed a truck carrying 65 cattle | ६५ गुरे वाहून नेणारा ट्रक नरडाणा पोलिसांनी पकडला

६५ गुरे वाहून नेणारा ट्रक नरडाणा पोलिसांनी पकडला

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील कलमाडी फाट्यावर नरडाणा पाेलिसांची तपासणी मोहीम सुरु होती. शिरपूरकडून धुळ्याकडे येणारा एमपी ०९ एचएच ५१६२ या क्रमांकाचा ट्रक कलमाडी फाट्यावर दाखल झाला. ट्रकमध्ये काय आहे अशी विचारणा चालकाकडे करण्यात आली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आली. ट्रकमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले. यात ६५ गुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळूून आली. यातील ६ गुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

२५ लाखांच्या ट्रकसह ३ लाख ९६ हजार किमतीची गुरे असा एकूण २८ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी दरबारसिंग गिरासे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ट्रकचालक चालदास देविदास बैरागी (३५, रा.मंदसोर, मध्यप्रदेश) आणि उपलाल तेजमल मेघवाल (२४, रा. निमज, मध्यप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Nardana police nabbed a truck carrying 65 cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.