चार इच्छूक उमेदवारांची नावे पाठविली मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST2021-09-12T04:41:37+5:302021-09-12T04:41:37+5:30

मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये शनिवारी भाजपाची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, लक्ष्मण साहूजी आदी उपस्थित होते. ...

The names of four aspiring candidates were sent to Mumbai | चार इच्छूक उमेदवारांची नावे पाठविली मुंबईला

चार इच्छूक उमेदवारांची नावे पाठविली मुंबईला

मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये शनिवारी भाजपाची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, लक्ष्मण साहूजी आदी उपस्थित होते.

५० पैकी ३ नगरसेवक गैरहजर

महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, वालीबेन मंडाेरे, संजय पाटील यांचे नावे चर्चेत आहे. सुरुवातील चारही उमेदवारांच्या मुलाखतील पक्ष निरीक्षकांनी घेतल्या. त्यानंतर उपस्थित नगरसेवकांकडून इच्छूक असलेल्या महापौर पदासाठी उमेदवारांविषयी मते जाणून घेतली. यावेळी देवपूर भागातील रस्ते, शहरातील अनियोजित पाणीपुरवठा, स्वच्छतेची समस्यासह धुळेकरांना भेडसावत असलेल्या प्रश्न साेडविण्याकडे जो उमेदवार प्रामाणिकपणे काम करेल अशा उमेदवाराला पक्षाकडून महापौरपदाची संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा काही नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी तीन नगरसेवक आजारी असल्याने यावेळी उपस्थित राहू शकले नाही.

सत्ताधारी नगरसेवकांना हलविले अज्ञातस्थळी

महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता असताना विरोधकाकडून फोडाफोडीचे राजकारण करू नये, यासाठी सायंकाळी उशिरा पर्यत मुलाखतील झाल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविण्याचे नियोजन पक्षाकडून केले जात होते.

शहराला १७ सप्टेंबरला मिळणार नवीन महापौर. महापौर चंद्रकांत सोनार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे नवीन महापाैरांची निवड लांबणीवर पडली हाेती. न्यायालयाने महापौरपद ओबीसींसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर शनिवारपासून उमेदवारी अर्ज विक्रीला सुरवात झाली आहे. त्यानंतर १७ सप्टेंबर राेजी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष महासभेत दाखल अर्जांची छाननी हाेऊन पंधरा मिनिटात महापाैरांची निवड होणार आहे.

Web Title: The names of four aspiring candidates were sent to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.