फागणे येथील सिटी सर्व्हे कार्यालय नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST2021-08-28T04:40:08+5:302021-08-28T04:40:08+5:30
फागणे येथे अनेक वर्षांपासून सिटी सर्व्हे कार्यालय आहे. हे कार्यालय गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी सुरू होते. ग्रामीण भागातील ...

फागणे येथील सिटी सर्व्हे कार्यालय नावालाच
फागणे येथे अनेक वर्षांपासून सिटी सर्व्हे कार्यालय आहे. हे कार्यालय गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी सुरू होते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घर नावावर करणे, हक्कसोड करणे आदी अनेक प्रकारची कामे या कार्यालयात केली जात होती. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून हे कार्यालय बंद आहे ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यालय कोणत्या दिवशी उघडते काही थांगपत्ता नाही परिसरात तपास केला असता आठवड्यातून गुरुवारी उघडते, असे नागरिकांनी सांगितले असता कामानिमित्ताने अनेक नागरिक या कार्यालयाच्या ओट्यावर बसून होते .याबाबत सुधीर देवरे या नागरिकाला विचारले असता ते म्हणाले की, फागणे येथील ऑफिस नेहमीच बंद असते या ऑफिसात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असताना अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन या कार्यालयासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.