नगाव गंगामाई कॉलेज ऑफ बी. फार्मसीचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:56+5:302021-06-05T04:25:56+5:30
गंगामाई फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक प्रशांत सयाईस ९५.७० टक्के, द्वितीय क्रमांक साक्षी गांगड ९३.७८ टक्के, ...

नगाव गंगामाई कॉलेज ऑफ बी. फार्मसीचा १०० टक्के निकाल
गंगामाई फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक प्रशांत सयाईस ९५.७० टक्के, द्वितीय क्रमांक साक्षी गांगड ९३.७८ टक्के, तृतीय क्रमांक दुर्गेश शिंदे ९२.१५ टक्के गुण मिळाले. तर द्वितीय वर्ष बी.फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक मेघना बिरारी ९४.३७ टक्के, द्वितीय क्रमांक विवेक नेरकर ९०.०७ टक्के तर धनंजय पाटील ८९.३३ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच तृतीय वर्ष बी.फार्मसीमध्ये प्रथम क्रमांक शेख अबुझार ८४.९२ टक्के, द्वितीय क्रमांक अंजली पाठक ८२.७८ टक्के तर श्रुती गवळी हिने ८२.११ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्याचप्रमाणे अंतिम वर्ष बी.फार्मसीत प्रथम क्रमांक वर्षा जैन ८२.५९ टक्के, द्वितीय क्रमांक गायत्री पाटील ८१.१५ टक्के तर जयेश पाटील याने ७९.२१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
गंगामाई बी.फार्मसी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. या महाविद्यालयाने घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या
गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगाव एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब भदाणे, व्हा.चेअरमन ज्ञानज्योती भदाणे, चेअरमन राम भदाणे, प्राचार्य डॉ. अनिलकुमार टाटिया, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद यांच्यासह प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.