नगरपंचायत  निवडणूक, १७  प्रभागांचे आरक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 21:16 IST2020-11-10T21:16:03+5:302020-11-10T21:16:03+5:30

साक्री :   साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या बिगुल वाजले आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण काढण्यात आले नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सोडतीत ...

Nagar Panchayat election, reservation of 17 wards | नगरपंचायत  निवडणूक, १७  प्रभागांचे आरक्षण 

नगरपंचायत  निवडणूक, १७  प्रभागांचे आरक्षण 

साक्री :   साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या बिगुल वाजले आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण काढण्यात आले नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सोडतीत आरक्षणात प्रभाग सोडत जाहीर करण्यात आली असून एकूण १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ९ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.  तर ८  जागांवर पुरुष अथवा स्त्री उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
आरक्षण यांनी केले जाहीर-
सदर आरक्षण सोडत वेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी भीमराज दराडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. 
एकूण सतरा प्रभाग-
एकूण सतरा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत प्रभाग क्र. १५  हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे, तर प्रभाग ३, ४ आणि ८  अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. यातही प्रभाग ३ आणि ८ हे अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 
प्रभाग क्रमांक ४ हा अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  नागरीकांचा मागास प्रवर्ग याकरिता प्रभाग क्रमांक सहा, बारा, तेरा, चौदा आणि सतरा हे प्रभाग राखीव करण्यात आले असून यात प्रभाग क्रमांक बारा, सोळा आणि सतरा हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
खुल्यासाठी असलेल प्रभाग-
   खुल्या प्रवर्गासाठी आठ प्रभाग राहणार आहेत. त्यातील प्रभाग क्रमांक १ , ५ , ७ आणि १० हे प्रभाग महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित २ , ९ , ११  आणि १६ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. साक्री नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीवेळी शहरातील नऊ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित होत असतांना देखील ॲड. पुनम शिंदे काकुस्ते या एकमेव महिला प्रतिनिधींची उपस्थिती होत्या.  गट वेळेस प्रभाग 
तीन मधून अपक्ष निवडून आल्या होत्या.  या वेळेस त्यांचा प्रभाग आरक्षित झाला असून त्यांचा हिरमोड झाला आहे.  त्या दुसऱ्या प्रभागातून निवडणूक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोडती वेळी होती महिलांमध्ये असलेली उदासीनता  जाणवली. 
तीन बालकांची मदत-
आगामी निवडणुकीचे प्रभाग आरक्षण सोडत काढण्यासाठी योगेश, कृष्णा, आणि नक्षत्र या तीन बालकांची मदत घेण्यात आली. बैठकीत प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडती विषयी घेण्यात येणार होती. मात्र या बैठकीत प्रारूप प्रभाग रचनेविषयी कुठलीही वाश्चता न् झाल्यामुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. 
सोडतीवेळी यांची उपस्थिती-
आरक्षण सोडतीवेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अरविंद भोसले, गटनेते ज्ञानेश्वर नागरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वेडु सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र मराठे, बापू गीते, अकबर शेख, याकुब पठाण, शैलेंद्र आजगे, ॲड. गजेंद्र भोसले, नगरसेवक सुमित नागरे, नितीन बेडसे, महेंद्र देसले, गोविंदा सोनवणे, रंगनाथ भवरे, विनोद पगारिया, विजय भोसले आदींसह      मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित          होते.

Web Title: Nagar Panchayat election, reservation of 17 wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे