‘माझं शहर बदलतय’़़़आमदार अनिल गोटे करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 12:12 IST2018-03-05T12:12:30+5:302018-03-05T12:12:30+5:30
१० मार्चला कामगार कल्याण भवनात बैठक, विरोधकांना आव्हान

‘माझं शहर बदलतय’़़़आमदार अनिल गोटे करणार आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा नदीपात्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना खुला विरोध करण्यात येत आहे़ त्यामुळे ‘माझं शहर बदलतय’ हे आंदोलन १० मार्चला सकाळी १० वाजता कामगार कल्याण भवन येथे करण्यात येणार आहे़ या आंदोलनात विरोधकांनाही बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे़
शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी पांझराकाठच्या रस्त्यांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली़ न्यायालयाने हरीत लवादचा पर्याय दिल्याने त्यांनी काही नेत्यांच्या सहकार्याने हरीत लवादमध्ये धाव घेतली़ विरोधकांकडे विकासाचा नेमका काय आराखडा आहे? शहराच्या विकासासाठी ते काय योगदान देणार आहेत? हे त्यांनी स्पष्ट करावे़ माझं शहर बदलतय हे आंदोलन १० मार्चला करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे केले आहे़