मनपाच्या भूखंडाची परस्पर विक्री, गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे आदेश
By भुषण चिंचोरे | Updated: March 29, 2023 16:17 IST2023-03-29T16:17:11+5:302023-03-29T16:17:26+5:30
हा भूखंड महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. खासगी व्यक्तीने त्याची परस्पर विक्री केली असून त्याठिकाणी सरंक्षक भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक रेलन यांनी दिली

मनपाच्या भूखंडाची परस्पर विक्री, गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे आदेश
धुळे - येथील महानगरपालिकेच्या आरक्षित खुल्या भूखंडांची परस्पर विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा असे आदेश महापौर प्रतिभा चौधरी यांनी प्रशासनाला दिले. बुधवारी महानगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महासभेत मनपाच्या मालकीच्या भूखंडाचा विषय चर्चेला आला त्यावेळी नगरसेवक हर्षकुमार रेलन, कमलेश देवरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. हा भूखंड महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. खासगी व्यक्तीने त्याची परस्पर विक्री केली असून त्याठिकाणी सरंक्षक भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक रेलन यांनी दिली. त्यावर महापौर चौधरी यांनी महानगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा व अतिक्रमण जमीनदोस्त करावे असे आदेश दिले.