नगाव, धमाणे, बिलाडी परिसरात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:25 IST2020-07-25T12:23:56+5:302020-07-25T12:25:30+5:30
गावांचा संपर्क तुटला : बिलाडी गावाला पुराच्या पाण्याचा विळखा, पाझर तलाव ‘ओव्हरफ्लो’

नगाव, धमाणे, बिलाडी परिसरात मुसळधार
लोकमत न्यूज नेटवर्क
धमाने : नगाव धमाने बिलाडी व परिसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सुमारे अर्धा ते एक तास चाललेल्या या मुसळधार पावसामुळे बिलाडी गावातून वाहणाऱ्या नदीला मोठा पूर आला. यामुळे बिलाडी गावाला पाण्याचा विळखा निर्माण झाला होता. दरम्यान, ही नदी ओलांडून पुढे कौठळ, तामसवाडी या गावांना जाणारा रस्ता आहे. त्यामुळे या गावांचा धुळे शहराशी संपर्क तुटला होता.
गेल्या चार-पाच दिवसांपासून नगाव, धमाने, तिसगाव ढंडाणे, बिलाडी, कापडणे व परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारीही जोरदार पाऊस झाला. परिसरातील सर्व लहान-मोठे पाझर तलाव पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचले आहे.
आज दुपारी नगाव बिलाडी परिसरात झालेल्या पावसामुळे सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आणि गावातून जाणाºया नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे.