ऑनलाईन बांधकाम परवानगीत नाशिक विभागात मनपा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:20+5:302021-01-21T04:32:20+5:30
अल्पावधीत झालेली कामगिरी शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे धुळे महापालिकेकडून १ ऑगस्ट २०१९ पासून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. ...

ऑनलाईन बांधकाम परवानगीत नाशिक विभागात मनपा प्रथम
अल्पावधीत झालेली कामगिरी
शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे धुळे महापालिकेकडून १ ऑगस्ट २०१९ पासून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट २०१८ ते फेब्रुवारी २०२० या सात महिन्याच्या कालावधीत १ हजार ५४४ नागरिकांनी घरकुलांना मंजुरीसाठी महापालिकेच्या रचनाकार विभागाकडे प्रस्ताव सादर केला होते़ त्यापैकी १ हजार ३१८ घरकुलांचे प्रस्तावांना ऑगस्ट मंजुरी मिळवुन दिली होती. अल्पावधीत ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारी धुळे मनपा राज्यातील एकमेव आहे़
नाशिक विभागात सलग
दुसऱ्या वर्षी धुळे मनपा प्रथम
राज्यात एकाच दिवशी ऑनलाईन बांधकाम मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी नाशिक विभागात धुळे महापालिकेलचा चौथा क्रमाक होता. सात महिन्यांनंतर धुळे महापालिकेने राज्यात ७५ टक्के उद्दिष्टे पूर्ण करीत प्रथम क्रमांक मिळविला होतो. तर लातूर मनपाने दुसरा व अहमदनगर महापालिकेने तिसरा क्रमांक मिळविला होता. यंदा पुन्हा कोरोना काळात महापालिकेने चांगल्या प्रकारचे उदिष्टे पूर्ण करीत २०१९ ते २०२० या कालावधीत ३ हजार ३२४ घरकुलांना ऑनलाईन परवानगी देत ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अहमदनगर पालिकेने २ हजार २२८ घरकुलांना मंजुरीत देत ७० टक्के उदिष्टे पूर्ण करीत दुसरा तर नांदेड महापालिकेने ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत तिसरा क्रमाक पटकविला आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी धुळे महापालिका अव्वल ठरत प्रथम क्रमाक मिळविला आहे.
४५ दिवसात दिली जाते मंजुरी
घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासकीय पातळीवर बांधकाम मंजुरीसाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी गेल्यावर्षी राज्य शासनाने आपले सरकार पोर्टलव्दारे महापालिका रचनाकार विभागाला जोडण्याचा निर्णय घेतला होता़ या पोर्टलव्दारे नोंदणी झालेल्या नागरिकांनी नोंदणी केल्यास मेसेज मिळाल्यानंतर महापालिकेला योग्य कागदपत्राची तपासणी करून ४५ दिवसांत लाभार्थ्यांला बांधकाम मंजुरी देणे सक्तीचे करण्यात आले आहे़