महापालिकेची आग्रा रोडवर धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:42 IST2019-12-12T11:42:17+5:302019-12-12T11:42:41+5:30
अवैध पार्किंगवरही कारवाई : पोलिसांचीही घेतली मदत

महापालिकेची आग्रा रोडवर धडक मोहीम
धुळे : शहरातील वर्दळीच्या भागात होणारी अवैध पार्किंग आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते़ हाच मुद्दा ‘लोकमत’ने उचलला आणि मालिका सुरु केली होती़ त्याची तातडीने दखल घेण्यात आली़ महापालिकेचे आयुक्त अजिज शेख आणि पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह अन्य अधिकाºयांची बैठक पार पडल्यानंतर गुरुवारपासून धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली़ आग्रा रोडसह पाचकंदिल भागात अवैध पार्किंग आणि अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे़ पाच कंदिलच्या भागात महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे पथक तैनात आहेत़ कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे़