मुंबईला ड्यूटी नको रे बाबा, एसटीच्या चालक-वाहकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:29+5:302021-03-31T04:36:29+5:30

तेथून परतलेल्या सुमारे ४५० कर्मचारी कोरोनासह वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले होते, तर ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार ...

Mumbai doesn't want duty, Baba, ST driver refuses | मुंबईला ड्यूटी नको रे बाबा, एसटीच्या चालक-वाहकांचा नकार

मुंबईला ड्यूटी नको रे बाबा, एसटीच्या चालक-वाहकांचा नकार

तेथून परतलेल्या सुमारे ४५० कर्मचारी कोरोनासह वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले होते, तर ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर मुंबई येथे सेवा देण्यासाठी राज्य शासनाकडून आदेश पारित झाल्यामुळे धुळे विभागातून वाहक आणि चालकांना सेवा देण्यासाठी पाठविण्यात आले. त्यात ४ हजार ५०० वाहक आणि तितकेच चालक यांनी आपली सेवा दिली. याशिवाय १ ऑक्टोबरपासून मुंबई येथील बेस्टसाठी धुळे विभागातून १०० बस पाठविण्यात आल्या होत्या. गत २५ आठवड्यांपासूनची ही स्थिती आहे. जानेवारी महिन्यापासून यात थोडा बदल करण्यात आला असून, पाठविण्यात आलेल्या १०० बसपैकी ५० बस परत बोलावून घेण्यात आल्या आहेत़

- परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबई येथे सेवा दिल्यानंतर वेगवेगळ्या आजाराने सुमारे ४०० ते ४५० कर्मचारी आजारी पडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर काही जण बरे होऊन पुन्हा आपल्या कामालादेखील लागले आहेत, शिवाय पाच जण असे निघाले होते की त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. आता त्यांचीही प्रकृती ठीक आहे़

- प्रतिक्रिया

विभागाच्या आदेशान्वये आम्हाला मुंबई येथील नागरिकांसाठी पाठविण्यात आले होते. तेथे योग्य ती सेवा देऊन परतलो आहोत. आम्ही काळजी घेतली होती. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालनदेखील केले असल्याचे एका चालकाने सांगितले़

- प्रतिक्रिया

विभागाच्या आदेशामुळे आम्हाला मुंबईला जाण्याची वेळ आली. बसमध्ये नागरिकांशी सर्वाधिक संबंध येत असल्यामुळे आम्ही काळजी घेतली होती. तरी देखील तब्येत बिघडली. औषधोपचार घेण्यात आला असून, आता प्रकृती बरी आहे, असे एका वाहकाने सांगितले.

Web Title: Mumbai doesn't want duty, Baba, ST driver refuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.