धुळ्यातील मोगलाईत हाणामारी, तिघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:53 IST2018-02-11T12:53:06+5:302018-02-11T12:53:38+5:30

भोईवाड्यातील घटना : लग्नात नाचण्याचे झाले निमित्त

Mugali violence in Dhule, crime against three | धुळ्यातील मोगलाईत हाणामारी, तिघांविरुध्द गुन्हा

धुळ्यातील मोगलाईत हाणामारी, तिघांविरुध्द गुन्हा

ठळक मुद्देमोगलाईतील भोईवाड्यात घडली घटनाहाणामारीत काठीचा वापर झाल्याने तणावघटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने शांतता

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लग्नात नाचण्याच्या कारणावरुन शहरातील मोगलाईतील भोईवाड्यात शनिवारी रात्री हाणामारीची घटना घडली़ अचानक झालेल्या या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने तणाव निवळला होता़ याप्रकरणी तिघांविरुध्द शहर पोलिसात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला़ 
शहरातील साक्री रोडवर मोगलाई भागालगत भोईवाडा आहे़ या ठिकाणी लग्न असल्यामुळे वाजंत्रीवर नाचण्याचा कार्यक्रम सुरु होता़ यात नाचण्याच्या कारणावरुन शाब्दिक चकमक उडाली़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ हाणामारीची ही घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ यात काठीचा सर्रासपणे वापर झाल्याने पप्पू इस्माईल शेख (१९) रा़ फुलेनगर, मोगलाई याला डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली़ त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ 
याप्रकरणी पप्पू इस्माईल शेख याने शहर पोलिसात रविवारी पहाटे साडेबारा वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, पप्पू वाडीले, सोनू वाडीले, नंदू वाडीले (पुर्ण नाव माहित नाही) (सर्व रा़ मोगलाई, धुळे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आऱ बी़ मांडेकर करीत आहेत़

Web Title: Mugali violence in Dhule, crime against three