गढूळ पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:00+5:302021-07-26T04:33:00+5:30
बँकांची अडचण धुळे : शासनाच्या विविध विभागात नोकर भरती बंद आहे. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. या बेरोजगारांना बँकांमधूनही ...

गढूळ पाणीपुरवठा
बँकांची अडचण
धुळे : शासनाच्या विविध विभागात नोकर भरती बंद आहे. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. या बेरोजगारांना बँकांमधूनही कर्ज मिळत नसल्याने, त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. तरुणांना कर्ज देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर फलक लावा
धुळे : येथील राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अंतराचे फलक नसल्याने, वाहनधारकांचा गोंधळ होत असतो. त्यामुळे संबंधित विभागाने किलोमीटर अंतराचे तसेच दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
दुभाजक स्वच्छ करा
धुळे : येथील कृषी महाविद्यालयासमोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक असून, त्या दुभाजकांमध्ये काटेरी झुडपे उगवलेली आहेत. त्याच्या फांद्या रस्त्यावर आल्याने त्या वाहनधारकांना लागतात.
तांडा चालला...
धुळे : पावसाळा लागल्याने मजुरांचे तसेच मेंढपाळांचे तांडे गावाकडे परत जात आहेत. पावसाळ्यात गाव पातळीवर शेतीची कामे उपलब्ध होतात तसेच शेतशिवारांमध्ये चारा देखील उपलब्ध असतो.