रेलन कुटुंबाला महावितरणकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:55 IST2020-11-29T12:54:55+5:302020-11-29T12:55:13+5:30
धुळे : साक्री रोडवरील कुमार नगरातील एका बालकाचा काही महिन्यापूर्वी विद्युत खांबला स्पर्श होऊन विजेच्या धक्याने मृत्यू झाला होतो. ...

dhule
धुळे : साक्री रोडवरील कुमार नगरातील एका बालकाचा काही महिन्यापूर्वी विद्युत खांबला स्पर्श होऊन विजेच्या धक्याने मृत्यू झाला होतो. मयत लव्यम रेलन यांच्या कुटुंबाला मदतीसाठी आमदार फारूख शाह यांनी प्रयत्न केले होते. त्यांना नुकताच महाविजवितरणने कंपनीकडून चार लाखांचा धनादेश देण्यात आला.
कुमार नगरातील लव्यम रेलन हा बालक अंगणात खेळत असतांना पोलमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने शहरात व कुमारनगर भागात महावितरणच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता. दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. धुळेशहराचे आमदार फारूक शाह यांनी लव्यम रेलनच्या परिवारासची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. आमदार शाह यांनी तत्कालीन उर्जा मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन दोषी व जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून लव्यम रेलनच्या परिवारास मदत देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर निवेदनाची दखल घेण्यात आल्याने चार लाखांचा धनादेश रेलन कुटंबीयासआमदार फारूक शाह यांचे चिरंजीव सेहबाज फारूक शाह यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी महाविज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता के. एस. बेळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. टी. पवार, महेंद्र रेलन, निशांत रेलन, परवेज शाह आदी उपस्थित होते.