नोकरी सांभाळून केला एमपीएससीचा अभ्यास....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:57 IST2019-11-24T21:55:39+5:302019-11-24T21:57:55+5:30

धुळ्याचा शुभम पुरकर राज्यात प्रथम

 MPSC study done on the job ... | नोकरी सांभाळून केला एमपीएससीचा अभ्यास....

Dhule

ठळक मुद्देपरीक्षेत उर्त्तीण होण्याची मनात जिद्द व चिकाटीराज्यात प्रथम क्रमांकांनी उर्त्तीणआई-वडीलांच्या मेहनतीला आज खºया अर्थाने यश४५० पैकी ३५३ गुण मिळवितनंदूरबार येथे पालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक रचनाकार पदावर कार्यरत

चंद्रकांत सोनार ।
धुळ्यातील जयहिंद प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षण झाल्यांनतर पुण्यातील वडगाव येथील सिहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण झाल्यानंतर परीक्षेच्या तयारीला लागलो़ परिक्षेत पहिल्यांदा प्रयत्न यश मिळाल्याने आत्मविश्वास होता की, पुढील परीक्षेत चांगल्या गुणांनी उर्त्तीण होऊ शकतो़ त्यामुळे यंदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविता आले, असे मत शुभम पूरकर यांने ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसातून किती वेळ दिला?
उत्तर : नंदूरबार येथे पालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक रचनाकार पदावर कार्यरत आहे़ नोकरी सांभाळून एमपीएससी परिक्षेच्या अभ्यासाकरीता दिवसभरातून ३ ते ४ तास वेळ काढला होता़े त्यासाठी खाजगी अ‍ॅकडमीची मदत घेतली व ‘एमपीएससी’ परिक्षेत यश मिळविले़
प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती वेळ
स्पर्धा-परीक्षा दिल्यात?
उत्तर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उर्त्तीण होण्याची मनात जिद्द व चिकाटी होती़ २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात २१ वा क्रमांक मिळवित जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता गट अ शाखेत नियुक्ती झाली़ यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या परिक्षेत बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून राज्यात प्रथम आलो़
प्रश्न : यावर्षी दिलेल्या परीक्षेसाठी किमी विद्यार्थी सहभागी झाले होते?
उत्तर : पहिल्या परीक्षेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेची तयारी केली़ त्यासाठी चाळीस हजार विद्यार्थीनी परीक्षा दिली होती़ त्यात मला ४५० पैकी ३५३ गुण मिळवित राज्यात पहिला आलो़
प्रश्न : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्याना तुम्ही काय सांगाल?
उत्तर : स्पर्धेचा अभ्यास करतांना कोणत्याही परीक्षेला कमी समजू नका, परीक्षा ही परीक्षाच असते़ त्यासाठी सतत वाचन करा़ कठोर परीश्रम, जिद्द व चिकाटी ठेवली तर तुम्ह निश्चित यशस्वी होऊ शकतात असेही पूरकर यांने सांगितले़
पूरकर परिवारातील पहिला विद्यार्थी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धुळ्यातील पूरकर परिसरातील दिलीप निंबा पूरकर व आई हर्षा पूरकर यांचा लहान चिरंजीव शुभम यांने सगल दुसऱ्यांदा परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे़ आई-वडीलांच्या मेहनतीला आज खºया अर्थाने यश मिळाले असल्याचे पूरकर परिवाराने सांगितले़
बारावीपासून अभ्यास..
शुभम पूरकर यांचे मोठे बंधू युगान्त पूरकर गेल्या सात सात वर्षांपासून मुंबई महापालिकेत अभियंता म्हणून कार्यरत आहे़ भावाप्रमाणे नोकरी करण्याची शुभमची इच्छा असल्याने त्यांने बारावीनंतर स्पर्धा परीक्षेचा सराव केला़ त्यानंतर पहिल्यांदा उर्त्तीण झाल्यानंतर देखील प्रथम क्रमाक मिळविण्यासाठी शुभमने दुसºयांदा एमपीएससीची परीक्षा दिली व त्यात चांगले मार्ग मिळवित राज्यात प्रथम क्रमांकांनी उर्त्तीण झाला





 

Web Title:  MPSC study done on the job ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे