खासदार राहुल गांधी १ मार्चला धुळ्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:32 IST2019-02-18T15:30:34+5:302019-02-18T15:32:27+5:30

काँग्रेसची बैठक : रोहिदास पाटील यांना जिंकून आणण्याचा निर्धार

MP Rahul Gandhi will come to Dhule on March 1 | खासदार राहुल गांधी १ मार्चला धुळ्यात येणार

खासदार राहुल गांधी १ मार्चला धुळ्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदार संघातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांना जिंकून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि संपुर्ण ताकदीनीशी काम करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी बैठकीतून केले़ दरम्यान, खासदार राहुल गांधी यांची १ मार्च रोजी धुळ्यात जाहीर सभा होणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले़ खासदार राहुल गांधी यांच्या दौºयाच्या अनुषंगाने रोहिदास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात सोमवारी सकाळी काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली़ यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून पदाधिकाºयांनी जाणून घेतल्या़ बैठकीत रोहिदास पाटील, अमरिशभाई पटेल, कुणाल पाटील, राजवर्धन कदमबांडे, श्यामकांत सनेर, शिवाजी दहिते, किरण शिंदे, मधुकर गर्दे, विलास खोपडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ 

Web Title: MP Rahul Gandhi will come to Dhule on March 1

टॅग्स :Dhuleधुळे