जिल्हा रूग्णालयासह सर्वोपचार केंद्रात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:29 IST2019-11-19T11:28:33+5:302019-11-19T11:29:06+5:30
स्वच्छता मोहीम राबवा : आमदार डॉ़ फारूख शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी प्रशासनाला आदेश

Dhule
धुळे : येथील भाऊसाहेब हिेरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाच्या परिसरात अस्वच्छता झाली आहे़ त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने तत्काळ स्वच्छता करावी, असे आदेश आमदार डॉ़ फारूख शाह यांनी दिले़
शहरातील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात आमदार डॉ़ शाह यांनी सोमवारी पाहणी केली़ यावेळी शल्यचिकित्सक डॉ़ एम़ पी़ सोनवणे, डॉ़ संजय शिंदे, प्रतिभा घोडके, कमलेश परदेशी, एस़जे़ आहिरे आदी उपस्थित होते़ पाहणीप्रसंगी आमदार डॉ़ शाह म्हणाले की, रूग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रूग्णांचे आरोग्य धोक्यात येवू शकते़ रूग्णालयाचे शहराबाहेर स्थालांतर झाल्याने रूग्णांना अडचण येत असल्याने शहरातील सर्वाेपचार रूग्णालय सुरू करण्यात आले आहे़ रूग्णांना पुरेसा सुविधा मिळण्यासाठी वरिष्ठांशी बोलुन कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील़ उपचारासाठी पुरेसा औषधसाठा ठेवावा तसेच रूग्णालयाचा परिससरात स्वच्छता मोहिम राबवावी असे आदेश आमदार डॉ़ शाह दिला़
मूलभूत सुविधा पुरविण्याचे उपमहापौरांचे आदेश
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूणांना मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी शनिवारी रूग्णालयाची पाहणी केली़ रूग्णालयाच्या परिसरात स्वच्छतेसह औषधांसाठी रूग्णांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे़ रूग्णालयात अस्वच्छता असल्याने रूग्णांना दुर्गंधीमध्ये उपचार घ्यावे लागत आहे़
यावेळी अधिष्ठाता डॉ़ रामराजे यांच्यासोबत उपमहापौर अंपळकर, मनसेचे परदेशी यांनी विविध विभागांची पाहणी करून समस्या सांगितल्या़ तसेच १५ दिवसांपासून बंद असलेला सिटी स्कॅन, रूग्णांना औषधी उपलब्ध, रूग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करावी अन्यथा आठ दिवसात आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपमहापौर अंपळकर यांनी दिला़ यावेळी मनसेचे शहराध्यक्ष हर्षल परदेशी विश्वजीत चौगुले, दर्शन कुलकर्णी, निखील डोमाडे आदी उपस्थित होते़