कर्मचारी वेतनासाठी चिमुकल्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:09 IST2019-03-02T23:09:33+5:302019-03-02T23:09:48+5:30

महापालिका : आयुक्त देशमुखांना निवेदन मांडला ठिय्या

Movement of sparrows for employee wages | कर्मचारी वेतनासाठी चिमुकल्यांचे आंदोलन

dhule

धुळे : शहरातील मनपा संचलित इंग्रजी माध्यम शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही़ शासनाने पुर्नवसनासाठी मंजूरी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आले़
शहरातील महापालिका शाळा क्रमाकं ३, ९, १४, २५ येथील कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही़ मात्र याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही़
वेतन वाढीबाबत महापालिका प्रशासनाने वरिष्ठस्तरावर योग्य निर्णय घेऊन इंग्रजी शाळांना पुर्नवसन करावे, इंग्र्रजी शाळांना मंजूरी देऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे़ अशी मागणी निवेदनाव्दारे कर्मचाऱ्यांनी केली आहे़
निवेदनावर चंद्रकांत गवळी, रईस शाह, फराह ताज शखे शरीफ, मिना गवळी, जाविद शाह, बुरहानोद्दीन शेख फमरोद्दीन, प्रतिभा खांडेकर, योगिता खांडेकर, योगिता देठे, जयश्री गवळी, रफिक शाह, भुषण सांळुखे, दिपक देठे, छबाबाई गवळी, मयुर हसमाने, माया हसमाने , माया हसमाने, हमीद पिंजारी, शकील,आशा भालेकर, रंजना बच्छाव आदींच्या स्वाक्षºया आहेत़

Web Title: Movement of sparrows for employee wages

टॅग्स :Dhuleधुळे