स्थायी सभापतींच्या विरोधात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:43 AM2019-05-20T11:43:17+5:302019-05-20T11:44:05+5:30

महापालिका  : लोकजनशक्ती पार्टीचे मागणी 

Movement Against Standing Chairmen | स्थायी सभापतींच्या विरोधात आंदोलन 

धरणेवेळी निदर्शने करतांना लोकजनशक्ती पार्टीचे पदाधिकारी़

Next


धुळे :  शहरातील डॉ. दीपश्री नाईक यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मनपाच्या स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील व त्यांच्या साथीदारांवर प्राणघातक हल्ला व विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकजनशक्ती पाटीर्ने केली आहे. 
दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतरही कारवाई न केल्याने पार्टीतर्फे शुक्रवारी जेलरोडवर निदर्शने करण्यात आली.याविषयी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, धनू युवराज पाटील, दीपक युवराज पाटील, गणेश राजेंद्र पाटील, राजेंद्र चैत्राम पाटील यांच्यासह आठ ते दहा जणांनी २७ मे रोजी रात्री डॉ. दीपश्री राजेश नाईक यांच्यासह त्यांच्या पतीला विशालनगरातील घरात घुसून मारहाण केली होती. युवराज पाटील यांनी डॉ. नाईक यांचा विनयभंग केला. याप्रकरणी संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्यांना अटकही केलेली नाही. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाºयांची चौकशी करावी, सभापती युवराज पाटील यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ला, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 प्रशासनाने कारवाई न केल्यास डॉ. नाईक यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शहराध्यक्षा प्रमोद सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा चव्हाण, कुंदन खरात, मधुकर चव्हाण , रवी नगराळे आदी सहभागी झाले होते. 

 

 

Web Title: Movement Against Standing Chairmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे