आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:58+5:302021-07-18T04:25:58+5:30
कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवरून घेण्यात आलेला होता़ पहिल्या लाटेत तर ...

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत
कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवरून घेण्यात आलेला होता़ पहिल्या लाटेत तर शाळा पूर्णपणे बंदच होत्या़ आता दुसरी लाटदेखील ओसरली असल्याने शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत़ त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असल्या तरी आपल्या मुलांना कोरोनाची लागण होणार नाही, याची सर्वस्वी काळजी मुलांचे पालक घेत आहेत़
शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा!
शासनाने काही अटींवर शाळा सुरू केल्या आहेत़ टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मुलांना आता शाळेत बोलाविले जात असल्यामुळे मुले शाळेत जात आहेत़ कोरोनाचा काळ असल्यामुळे शाळेतून घरी येताच मुलांनी कपडे बदलायला हवे़ एवढेच न करता त्यांनी आंघोळदेखील करायला हवी़ स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे़
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!
- मुलांना शाळेत पाठविले खरे, पण त्यांच्याकडे आमचे लक्ष असते़ कोरोनाचा काळ सुरू असल्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला काळजी वाटते़
नीता खलाणे
- सर्व प्रकारची आवश्यक ती काळजी घेऊन मुलांना शाळेत पाठविले आहे़ त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी़
माधुरी बच्छाव
- शासनाने सांगितल्यानुसार आम्ही मुलांना शाळेत पाठविले आहे़ खबरदारी घेऊन शाळा प्रशासनाने मुलांची काळजी घ्यावी़ त्यांच्याकडे लक्ष द्यावे़
अंजली सुतवणे
जिल्ह्यातील एकूण शाळा : ५६०
सुरू झालेल्या शाळा : २७७
अद्याप बंद असलेल्या शाळा : २८३
अ) मास्क काढू नये़
ब) वारंवार हात साबणाने धुवावा किंवा
सॅनिटायझर वापरावे़
क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे़
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला
टाकावेत आणि आंघोळ करावी़