सोमवारी जनता कफ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 18:26 IST2020-05-31T18:23:57+5:302020-05-31T18:26:49+5:30
संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कफ्यूचा निर्णय

dhule
धुळे : कोरोनाच्या विषाणुमुळे उध्दवनाच्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे़ या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी व निर्माण झालेल्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोमवारी १ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पावेतो संपुर्ण दिवसभर जनता कफ्यू ठेवण्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़
शहरातील व जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती लक्षात घेता व विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कफ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे़ यामध्ये हॉस्पिटल, औषधे विक्रीची दुकाने, अतितातडीचे शासकीय कर्मव्यावरील असलेले कर्मचारी, सुरक्षा रक्षक, यंंत्रगाव कायदा व सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रिंट व इलेक्ट्रानिक्स मिडीयाचाचे प्रतिनधी आदीना वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद राहतील़