मोहिदा जिल्हा परिषद शाळा बनली डिजीटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:39 IST2019-07-25T22:39:33+5:302019-07-25T22:39:55+5:30
पालकांमध्ये समाधान : शिक्षकांकडून स्वखर्चाने केली उभारणी; तीन शिक्षकांचे प्रयत्न

डिजीटल शाळेचे लोकार्पण करताना पी़झेड़रणदिवे. सोबत अॅड़नीता सोनवणे, स्वप्नील पावरा़
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील मोहिदा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत डिजीटल रूमचा लोकार्पण सोहळा गटशिक्षणाधिकारी पी़झेड़ रणदिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला़
२४ रोजी जि.प.शाळा मोहिदा येथे झालेल्या कार्यक्रमासाठी शिक्षणविस्तार अधिकारी अॅड़निता सोनवणे, केंद्रप्रमुख किशोर भदाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल पावरा, मुख्याध्यापक सी.एस़ पाटील, मुख्याध्यापक रा.का. पाटील, पोलिस पाटील स्वप्निल पावरा, मनोहर वाघ, प्रमोद भोई, समाधान बोरकर, विजयानंद शिरसाठ, के.बी. पवार, मधुकर थेले, बैसाणे, निता पावरा, सीमा पावरा, रंजना पावरा, योगिता पावरा, अशोक पावरा, हिरालाल पावरा, नारसिंग पावरा, सुनिल बैसाणे, मुकेश पावरा, इखला पावरा आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या पंधरवड्यात गटशिक्षणाधिकारी रणदिवे यांनी या शाळेला भेट दिली़ त्यावेळी तिन्ही शिक्षकांना लवकरात लवकर डिजिटल रुम तयार करण्याचे आवाहन करून स्वत २ हजार रूपयांची वर्गणी दिली होती. त्यानंतर शाळेच्या तिन्ही शिक्षकांनी स्वखर्चाने अवघ्या काही दिवसातच डिजिटल रुम तयार केली़
सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डिजिटल रूमचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमाकांत गुरव, प्रास्ताविक ईश्वर पावरा तर आभार प्रदर्शन मुकेश कोष्टी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ईश्वर पावरा, मुकेश कोष्टी व उमाकांत गुरव यांनी परिश्रम घेतले़