मोहाडी पोलिसांचा जुगाऱ्यांना दणका ७० हजाराचा मुद्देमाल केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 22:56 IST2020-09-08T22:56:31+5:302020-09-08T22:56:59+5:30

वडजाई रोड : पाच जणांना पकडले

Mohadi police seize Rs 70,000 from gamblers | मोहाडी पोलिसांचा जुगाऱ्यांना दणका ७० हजाराचा मुद्देमाल केला जप्त

मोहाडी पोलिसांचा जुगाऱ्यांना दणका ७० हजाराचा मुद्देमाल केला जप्त

धुळे : शहरातील वडजाई रोडवरील आखरी बुध दर्गाजवळ रंगलेल्या जुगार अड्यावर मोहाडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकून दणका दिला आहे़ ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे़
सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील आखरी बुधदर्गाजवळ काही जणं पैसे लावून हारजीतचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांना माहिती मिळाली़ त्यानुसार, पोलिसांचे पथक घेऊन त्यांनी छापा टाकला़ या छाप्यात पाच जणं पोलिसांच्या हाती लागले़ हे सर्व झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळत होते़ पाच जणांना पकडल्यानंतर त्यांची अंगझडती घेण्यात आली़ त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजय दाभाडे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, फिरोज शहा मुसा शहा, मुसा शेख पिसा, शेख शब्बीर शेख इब्राईम, चंद्रकांत वाघमोडे, आसिफ शेख युनूस या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत, कर्मचारी प्रभाकर ब्राम्हणे, कांतीलाल शिरसाठ, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, गणेश भामरे, धिरज गवते यांनी केली आहे़

Web Title: Mohadi police seize Rs 70,000 from gamblers

टॅग्स :Dhuleधुळे