धुळ्यात मोबाईलचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:03 IST2020-07-06T13:02:31+5:302020-07-06T13:03:21+5:30
बारा पत्थर परिसर : पहाटेची घटना

धुळ्यात मोबाईलचे दुकान फोडले
धुळे : शहरातील बारापत्थर चौकात असलेल्या एका कॉम्प्लेक्समधील मोबाईलचे दुकान चोरट्याने फोडल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़ यात लाखो रुपये किंमतीेचे मोबाईल चोरट्यांनी एका गोणीमध्ये भरुन लांबविले आहेत़ चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून चार जण आतमध्ये आणि एक जण बाहेर असल्याचे दिसत आहे़ शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़