जळगावात ११ लाखांचे मोबाइल लांबविले
By Admin | Updated: August 25, 2014 14:53 IST2014-08-25T03:32:40+5:302014-08-25T14:53:12+5:30
शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती गोलाणी मार्केटमध्ये भररस्त्यावरील न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ११ लाख ४६ हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले

जळगावात ११ लाखांचे मोबाइल लांबविले
जळगाव : शहरात चोेरट्यांनी उच्छाद मांडला असून चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र आहे.शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती गोलाणी मार्केटमध्ये भररस्त्यावरील न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ११ लाख ४६ हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले. दुसऱ्या घटनेत सुरेश कलेक्शनच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीची जाळी तोडून दुकानातील ६७ हजारांचा ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी गीता होजिअरी व फोम अॅण्ड फेब्रीक या दुकानात घरफोडी केली मात्र या ठिकाणी त्यांना हाती काहीही लागले नाही. चोरट्यांनी न्यू.जी.व्ही.एंटरप्रायजेस या मोबाईल दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्यांचे ११ लाख ४६ हजार रुपयांचे १०१ नग मोबाईल चोरट्यांनी गायब केले. नवी पेठ भागातील सुरेश कलेक्शनचे लॉक तोडून ६७ हजार ३१८ रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला.