मेंढपाळांच्या जमावाचा शेतकरी कुटूंबावर हल्ला ११ जणांवर गुन्हा; ७ संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:28+5:302021-09-16T04:44:28+5:30
साक्री तालुक्यातील डोंगराळे येथे वनशेतात मेंढ्या शिरल्याने पिकाचे नुकसान झाले. याचा जाब विचारला असता शेतकरी कुटूंबावर ११ जणांनी दमदाटी ...

मेंढपाळांच्या जमावाचा शेतकरी कुटूंबावर हल्ला ११ जणांवर गुन्हा; ७ संशयितांना अटक
साक्री तालुक्यातील डोंगराळे येथे वनशेतात मेंढ्या शिरल्याने पिकाचे नुकसान झाले. याचा जाब विचारला असता शेतकरी कुटूंबावर ११ जणांनी दमदाटी करत हल्ला केला. जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यात काठी लागल्याने चंद्रकलाबाई यांना दुखापत झाली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत काळगुबाई बंडू सोनवणे यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तात्या रामा व्हटगर, पावसा तान्हु मदने, शिवा आंबा व्हटगर, चंदन दादा सुपनर, लहानु नागो व्हटगर, शादा हरी व्हटगर, भिवा आंबा व्हटगर, गट्या तान्हु मदन, पांगा धोंडू सुपनर, रघु गेंदा शिंदे व बारक्या आंबा व्हटगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्या, पावसा, शिवा, चंदन, लहानु, शादा, भिवा यांना अटक केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे करीत आहेत.