पूरग्रस्तांच्या मदतीला मनसेची रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST2021-07-30T04:37:29+5:302021-07-30T04:37:29+5:30
धुळे : पूरग्रस्त कोकणवासीयांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रुग्णवाहिका धुळ्यातून रवाना झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ...

पूरग्रस्तांच्या मदतीला मनसेची रुग्णवाहिका
धुळे : पूरग्रस्त कोकणवासीयांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रुग्णवाहिका धुळ्यातून रवाना झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे धुळे येथे लोकार्पण झाले होते. तीच रुग्णवाहिका गुरुवारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाली. रुग्णवाहिकेसोबत एक लहान मालवाहू गाडी भरून जीवनावश्यक वस्तूही पाठविल्या आहेत. त्यात खाद्यापदार्थ, पाण्याच्या बाटल्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते नारळ वाहून या दोन्ही गाड्या कोकणसाठी रवाना झाल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर, राज्याचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष पदाधिकारी ॲड. दुष्यंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. धुळे शहरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले होते. तसेच मनसेचे जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या पाटील, शहराध्यक्ष अमिषा गावडे, संतोष मिस्तरी, साक्री तालुका अध्यक्ष योगेश सोनवणे, धुळे तालुकाध्यक्ष नंदू पाटील, उपाध्यक्ष दीपक पाटील, राजेश दुसाने, नीलेश गुरव, साहिल खान, अविनाश देवरे, हरीश जगताप, अक्षय शिंदे, प्रज्वल चव्हाण, रोहित नेरकर, अमृत पाटील, मनोज जाधव, भूषण सोनवणे आदींनी देखील या उपक्रमात योगदान दिले.