पिक विम्यासाठी आमदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ ला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:24 PM2020-01-28T12:24:54+5:302020-01-28T12:25:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत या तालुक्यातील १२ हजार ५४१ लाभार्थी पिक विमाधारक शेतकरी ...

MLA for crop insurance on the 19th floor at the collector's office | पिक विम्यासाठी आमदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ ला मोर्चा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत या तालुक्यातील १२ हजार ५४१ लाभार्थी पिक विमाधारक शेतकरी बांधवांना व ४१० फळ पिक विमाधारक लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़
शिरपूर तालुक्यातील पिकनिहाय बाधित शेतकरी संख्या १२ हजार ५४१ आहे. कापूस ६ हजार ८०१ शेतकरी, मूग २ हजार ३०५, मका१ हजार १२९, उडीद ८९७, ज्वारी ६३४, बाजरी २९१, सोयाबीन ४०४, भुईमूग ३१, तूर ३३, तीळ ३, कांदा १६ असे एकूण १२ हजार ५४१ शेतकरी बांधवांना तसेच फळ पिक बाधित शेतकरी बांधव ४१० आहेत. शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने त्यांची पिक विमा रक्कम मिळावी यासाठी आमदार काशिराम पावरा यांच्या वतीने १६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
१० दिवसांच्या आत शेतकºयांना दिलासा न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येईल असे कळविण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नसल्याने २९ रोजी शेकडो शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून आपल्याला तातडीने पिक विमा मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करणार आहेत. आमदार काशिराम पावरा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.गेल्या वर्षी देखील आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने ९ कोटी रुपये पिक विमा मिळाला होता़ यावर्षी मात्र पिक विमा मिळण्यात होणारी दिरंगाई शेतकºयांसाठी खूपच मारक ठरली आहे.

Web Title: MLA for crop insurance on the 19th floor at the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे