फॉगिंग मशीनच्या डिझेलात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:00 IST2019-11-07T21:59:30+5:302019-11-07T22:00:33+5:30
महापालिका स्थायी समिती : डेंग्यूसह विविध विषयावर गाजली सभा

फॉगिंग मशीनच्या डिझेलात घोळ
धुळे : शहरातील काही भागांमध्ये फॉगिंग सुरु आहे़ त्यासाठी दररोज १०० लिटर डिझेल लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली़ मात्र, खर्चाच्या तुलनेत १० टक्के ही काम होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला़ छोटे फॉगिंग मशिन केवळ १५ ते २० मिनीटे चालत असल्याचे सांगितले़ त्यामुळे डिझेलमध्ये मोठा घोळ होत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला़ दरम्यान, निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पहिलीच सभा मनपाची झाली़
येथील महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा गुरुवारी सकाळी घेण्यात आली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज मोरे, सहायक आयुक्त शांताराम गोसावी यांच्यासह सदस्यांसह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती़
डेंग्यूसह आजारांचे थैमान
शहरात सध्या डेंग्यूसह विविध आजारांनी थैमान घातले आहे़ त्यासाठी शहरात धुरळणी यंत्राचा अर्थात फॉगिंग मशीनचा वापर केला जात आहे़ मात्र, या धुरळणीमुळे डासांना केवळ गुंगी येते़ ते मरत नसल्याचा अजब दावा महापालिकेकडून स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला़ स्थायी समितीच्या सभेत शहरातील रस्त्यांवरील खड्डे, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा या विषयावर जोरदार चर्चा झाली़ सदस्यांनी केलेल्या आरोपांवर गणेश गिरी यांनी प्रशासनाची भूमिका विषद केली़ ते म्हणाले, महापालिकेकडे लवकरच दोन मशिन येणार आहेत़ तसेच प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांसोबत वरिष्ठ अधिकाºयांची टीम पाहणी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले़
अधिकाºयांकडून टाळाटाळ
डेंग्यूचा एवढा प्रकोप सुरू असतांना प्रभाग क्रमांक १६ चे स्वच्छता निरीक्षक वसावे यांच्याशी संपर्क साधला असता ते नेहमीच टाळाटाळ करतात. कामाच्या ठिकाणी उपस्थित न रहाता गायब रहातात. त्यामुळे त्यांच्याजागी नवीन अधिकाºयाची नेमणूक करण्यात यावी, त्यांच्याकडून मलेरिया पर्यवेक्षकाचा अतिरिक्त भार काढून घ्या नाहीतर आमच्या भागासाठी पूर्ण वेळ एसआय नेमा अशी मागणी संतोष खताळ यांनी केली.
डॉक्टरांवर कारवाई भडगा
डेंग्यूसंदर्भात आरोग्य विभागाने मांडलेल्या आकडेवारीवर सदस्य समाधानी नव्हते़ खासगी डॉक्टरांकडून माहिती मिळवत रहावी़ माहिती दिली जात नसेल तर कारवाई करावी़
वारंवार सूचना करुन आणि जनजागृती करुनही काही निवासस्थानांमध्ये उघड्यावर पाणी साठा करुन ठेवण्यात येत आहे. यामुळे स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालत असून त्याद्वारे परिसरात डेंग्यूचा फैलाव होत आहे. यापूढे तिसºयांदा डेंग्यूची अंडी असलेले पाणी घरात आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा स्थायी समितीच्या सभेत आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांनी दिला आहे.