मेहेरगावावर शोककळा दोघा मित्रांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:29 IST2019-01-13T11:28:46+5:302019-01-13T11:29:02+5:30

शवविच्छेदनावेळी गर्दी

 Mirthgaon mourns two friends drowning | मेहेरगावावर शोककळा दोघा मित्रांचा बुडून मृत्यू

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मंडप धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील नवलाणे शिवारात शुक्रवारी दुपारी घडली़ ही घटना सायंकाळी उजेडात आल्याने ते राहत असलेल्या मेहेरगाव गावावर शोककळा पसरली.
धुळे तालुक्यातील मेहेरगाव गावात राहणारे अनिल शिवाजी भामरे (१८) आणि खुशाल शिवाजी भामरे (४१) हे दोघे मित्र आहेत़ अनिल याची शेती असून खुशाल याचा मंडपाचा व्यवसाय आहे़ सध्या लग्न सराई बंद असल्याने मंडप धुण्यासाठी मेहेरगावपासून जवळच असलेल्या नवलाणे शिवारात खुशाल भामरे हा मंडप धुण्यासाठी गेला़ त्याच्यासोबत अनिल हा देखील गेला होता़ मंडप पाण्यात धुत असताना एकाचा तोल गेला़ त्याला वाचविण्याचा प्रयत्न दुसऱ्याने केला़
यानंतर नवलाणे गावाचे पोलीस पाटील यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मेहेरगाव येथील अनिल याचा चुलत भाऊ भटू सुरेश भामरे यांना फोनद्वारे माहिती दिली़ माहिती मिळाल्यानंतर तातडीने गावातील मंडळी नवलाणे तलावाकडे धावले़
त्यांनी या दोघांचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़
डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केल्यानंतर त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदन गृहात दाखल करण्यात आले़ त्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़

Web Title:  Mirthgaon mourns two friends drowning

टॅग्स :Dhuleधुळे