शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळविले
By Admin | Updated: February 25, 2017 23:52 IST2017-02-25T23:52:57+5:302017-02-25T23:52:57+5:30
धुळे : शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला परिसरात राहणाºया एकाने परस्पर पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळविले
धुळे : शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला परिसरात राहणाºया एकाने परस्पर पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी शिरपूर पोलिसात एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़
शिरपुरातील जनतानगरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेत गेली होती़ त्यादरम्यान जनतानगरातच राहणारा मनोज धनराज सोनवणे याने मुलीला फूस लावून व आमिष दाखवून परस्पर पळवून नेले़, अशी फिर्याद मुलीच्या आईने शिरपूर शहर पोलीसात दिली़ त्यावरून संशयित मनोज सोनवणे याच्याविरुध्द भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पो़हेक़ॉ. पाटील करत आहेत़