सूक्ष्म नियंत्रण झोनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:17 IST2020-06-10T23:16:46+5:302020-06-10T23:17:17+5:30
आरोग्य सर्व्हेक्षण सुरू

dhule
दोंडाईचा : आरोग्य विभागाचे ३० पथकाकडून केले जातेय् सर्व्हेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.गेल्या तीन दिवसात पाच रुग्णांना बाधा झाल्याने दोडाईचा करांच्या चिंतेत भर पडली आहे.दरम्यान कंटेन्मेंट झोन मधील रहिवाशी कुटुंबाचे आरोग्य सर्व्हेक्षण ३० पथकामार्फत सुरू करण्यात आले आहे.
दोंडाईचा शहरात तीन दिवसात पाच कोरोना रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण शहरात १४ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील डालडा घरकुल, राणीपुरा सुराय नाला परिसर व गोविंद नगर भागातील अंजुम टाकी परिसर असे तीन कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
दोंडाईचात संपूर्ण संचारबंदी असून औषधाचे दुकान आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने व व्यवसाय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दोंडाईच्यात शुकशुकाट दिसतो. शहरात पोलिसांनी खडा पहारा सुरू ठेवला आहे. शहरातील सर्व सर्व प्रमुख रस्त्यांवर लोखंडी पाईप, दांडया लावून ते सील केले आहेत. सर्व शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोडाईचा नगरपालिकेने कनटेन्मेंट झोन मध्ये फवारणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे चार पथक तयार करण्यात आले आहेत. त्यात डालडा घरकुल, सुराई नाला परिसर व गोविंद नगर, उपजिल्हा रुगणालयाला फवारणी करण्यात आली आहे. या भागात व आवश्यक असलेल्या ठिकाणी पुन्हा फवारणी केली जाणार असल्याचे आरोग्य सभापती मनीषा जितेंद्र गिरासे यांनी सांगितले.
दरम्यान कंटेन्मेट क्षेत्रातील कुटुंब सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे. शनिवारी पाच तर रविवारी सात अशा १२ उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस आरोग्य सर्व्हेक्षण केले.
सोमवारी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या आदेशाने ३० आरोग्य पथकमार्फत सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. आरोग्य सर्व्हेक्षणात आरोग्य कर्मचारी,शिक्षक व होमगार्ड अशा १२० जणांचा समावेश आहे. या पथकाला प्रभारी अधिकारी डॉ. अनिल नरोटे व डॉ. सचिन पारख यांनी मार्गदर्शन केले. या पथकाने सोमवारी तीनही कंटेन्मेट झोनमधील १८०० घरांचे सर्व्हेक्षण केले. सलग १४ दिवस हे पथक त्या भागात घरोघरी जाऊन ताप, सर्दी आदींची माहिती घेऊन नोडल आॅफिसरल देतील. संशयास्पद रुग्णाचे परीक्षण आरोग्य पथके करणार असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल नरोटे यांनी दिली.सक्षम प्राधिकरण म्हणून डॉ. दीपक सावंत यांची नेमणूक झाली आहे.
कोरोना रुग्णाचा कंटेन्मेट झोनमध्ये प्रवेश व निर्गमण यास बंदी असल्याने या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.े नगरपालिकेचे कर्मचारी सशुल्क जीवनावश्यक वस्तू आणून देतील अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी दिली .