धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हसदी ग्रामस्थांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 17:37 IST2019-07-26T17:35:49+5:302019-07-26T17:37:06+5:30
योगेश पवार याच्या खुनाची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हसदी ग्रामस्थांचा मोर्चा
आॅनलाइन लोकमत
धुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी येथील योगेश पवार याच्या खून प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, वसंत देवरे याच्यासह त्याच्या साथीदारांना सहआरोपी करण्यात यावे आदी मागण्यांसाठी म्हसदी ग्रामस्थ, एकलव्य मित्र मंडळ यांच्यातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शिवतीर्थजवळील कल्याण भवन येथून मोर्चाला सुरूवात झाली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा जेलरोडवर आला. त्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, १२ जून २०१९ रोजी म्हसदी गावातील योगेश नानाजी पवार या तरूणाची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला.या प्रकरणातील दोन संशयित अटकेत आहेत. या प्रकरणाची फेर चौकशी करून हा गुन्हा सीआयडी सोपविण्यात यावा, डॉ. देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सहआरोपी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर अॅड. संतोष जाधव, संतोष अमृतसागर, जितेंद्र मोहिते, लक्ष्मण मालचे, भिकन मोहिते, उत्तम मालचे, शालीक पवार, अशोक मोहिते, नाना पवार, नाना मोहिते यांच्या स्वाक्षºया आहेत.