बोहरी समाजाने दिला बेटी पढाओचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:30 IST2018-12-16T17:30:12+5:302018-12-16T17:30:38+5:30

शिरपूर : ईद-ए-मिलादनिमित्त जुलूस शोभायात्रा

Message from the daughter of the daughter of the Belhi community given by the Boheri community | बोहरी समाजाने दिला बेटी पढाओचा संदेश

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरात बोहरी समाजाच्यावतीने ईद-ए-मिलाद निमित्त जुलूस शोभायात्रा काढून शांती व आमनचा संदेश देत बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला़
शहरातील बोहरा समाजाकडून बोहरा मस्जिदपासून शोभायात्रा काढून जामा मस्जिद, आंबा बाजार, पाच कंदील, बोहरा मस्जिद पर्यंत ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस काडण्यात आला़ त्या जुलूसमध्ये मोहम्मद पैगंबरवर नात पठण करण्यात आला़ त्या जुलूसमध्ये बोहरा समाजाने  खूप काही शिकवणी दिल्या़ त्यामध्ये शांती व आमनचा संदेश दिला, बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असे संदेश त्यांनी त्या जुलूसा दरम्यान लोकांपर्यंत पोहचविले़ बाहेरी समाजाचे शहराचे प्रेसिडेंट जनाब शेख, मुस्तफाभाई जळगाववाला, खोजेमाभाई कागलवाला, शेख मुतुर्जाभाई मालिक, मुल्ला अब्देअलीभाई, मुल्ला जुजरभाई, मुल्ला मोहसीनभाई, मुल्ला मुस्तफाभाई, मुतुर्जाभाई जामनेरवाला, मुस्तफाभाई आकोलावाला, हसनभाई सीहोरवाला, युसूफभाई जामनेरवाला, हातिमभाई आकोलावाला, मु.मुफद्दलभाई जलगांववाला, जुजरभाई सैफी, अदनानभाई बाबजी, जौहरभाई कपड़िया, अब्बासभाई नूरी, मोहम्मदभाई चिमढानावाला, मद्रसा नजमियाचे लहान मुलं-मुली, बुरहानी गार्ड्स, शबाबुल-ईदीज-झहाबी व संपूर्ण बोहरा समाज शोभायात्रेत सहभागी झाला होता़

Web Title: Message from the daughter of the daughter of the Belhi community given by the Boheri community

टॅग्स :Dhuleधुळे