धनूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST2021-01-25T04:36:39+5:302021-01-25T04:36:39+5:30
कापडणे प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या धनूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सरपंच सत्यभामाबाई शिंदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. ...

धनूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कापडणे प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या धनूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सरपंच सत्यभामाबाई शिंदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सत्काराचा कार्यक्रम उशिराने घेण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयत झालेल्या या कार्यक्रमाला गटनेते सुनील शिंदे व ग्रामसेवक अभय चौधरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, ट्रॅाफी देऊन सन्मानित करण्यात आले. यात दहावीतील रुचिता नीलेश शिंदे, निकिता प्रदीप पाटील, भूषण रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील शिंदे, ग्रा.पं. सदस्य कमल पटेल, लोनकुटे पोलीस पाटील राहुल शिरसाठ, राजेंद्र वाघ, देवीदास दगा शिंदे, सुशिला देवीदास शिंदे, नीलेश देवीदास शिंदे, कार्तिक शिंदे, भूषण शिंदे, अरुण पाटील, डॉ. मधुकर चौधरी, अशोक शिंदे, निंबा चौधरी, भटू भामरे दापुरा, गणेश खैरनार, किशोर बोरसे, विठ्ठल पटेल, राव कोळी आदी उपस्थित होते.