सदस्यांनी मारला मांसाहारावर ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:16 IST2020-08-06T13:16:24+5:302020-08-06T13:16:47+5:30
चर्चा : ऐन श्रावणात तीन बोकडची दिली कुर्बानी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रथमच जि.प.आवाराच्या बाहेरत निसर्गरम्य ठिकाणी झाली. मात्र याचा फायदा घेत सभेसाठी आलेल्या काही सदस्यांनी मात्र ऐन श्रावणात मासांहारी भोजनावर ताव मारल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच फिजिकल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी परिषदेची सर्वसाधारण सभा शहराबाहेर घेण्यात आली. सहाजिकच सभा बाहेर, निसर्गरम्य ठिकाणी असल्याने, सदस्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. सभेच्या ठिकाणी शाकाहारी भोजन होते. मात्र दिवसभर असलेले ढगाळ वातावरण, सर्वदूर हिरवळ असल्याने, अशा वातावरणात काही सदस्यांना मासांहारावर ताव मारण्याचा मोह आवरता आला नाही. सत्ताधारी काही सदस्यांनी सभेच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका झोपडीत जाऊन मासांहारावर यथेच्छ ताव मारला. यासाठी तीन बोकडांची कुर्बानी देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा या परिसरात सुरू होती. मासांहारवर ताव मारतांना या सदस्यांना श्रावण महिन्याचाही विसर पडला.