सोनगीरला ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:51+5:302021-07-18T04:25:51+5:30
८० वर्षांपूर्वी मोजणीनुसार ओबीसीचे ५२ टक्के होते तर आता ते ७० टक्के आरक्षण मिळायला हवे. १९३१ पासून मोजले गेले ...

सोनगीरला ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक
८० वर्षांपूर्वी मोजणीनुसार ओबीसीचे ५२ टक्के होते तर आता ते ७० टक्के आरक्षण मिळायला हवे. १९३१ पासून मोजले गेले नाही, ७५ वर्षात ओबीसी समाज मोजला जात नाही. त्यामुळे हे षडयंत्र चालले आहे. त्यासाठी ओबीसी समाजाला जागृत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी कृषी सभापती रामकृष्ण खलाने, विधितज्ज्ञ ॲड. प्रतीक कर्डक, जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, प्रा. दिनकर माळी यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी उपस्थित असलेल्या परिसरातील ओबीसी समाज बांधवांना एकत्र येऊन ओबीसी राजकीय व शैक्षणिक आरक्षण व ओबीसी संघटक या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी विधितज्ज्ञ ॲड. प्रतीक कर्डक, अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, अ.भा. महात्मा फुले समता परिषद नाशिक विभाग संघटक अनिल निळे, जिल्हा अध्यक्ष अ.भा. महात्मा फुले समता परिषद राजेश बागुल, अ.भा. महात्मा फुले समता परिषद जिल्हा कार्याध्यक्ष आर.के. माळी, माजी कृषी सभापती रामकृष्ण (बापू) खलाणे, जिल्हा युवा अध्यक्ष योगेश बागुल, प्रसिद्धीप्रमुख संतोष पुंड, प्रा. दिनकर माळी, पंचायत समिती सदस्य चेतन भाऊ चौधरी, उपसरपंच प्रतिनिधी धाकू बडगुजर, भिका माळी, पराग देशमुख, डॉ. कल्पक देशमुख, डॉ. युवराज नवटे, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत सदस्य आरीफ खाँ पठाण, विशाल कासार, श्याम माळी, अनिल पाटील, मोहन सैंदाणे, हाजी, अल्ताफ कुरेशी, सजन महाजन, मोहन परदेशी, डॉ. मनुकुमार पटेल, संजय माळी, साहेबराव बिरारी, कपिल परदेशी, प्रवीण बडगुजर, मोहन कासार, तैलिक महासभा धुळे तालुका कार्याध्यक्ष एल.बी. चौधरी सर, जितेंद्र बागुल, योगेश सैंदाणे आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.के. माळी, तर आभार प्रदर्शन एम.टी. गुजर सर यांनी केले.