शिरपुरात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:07+5:302021-08-13T04:41:07+5:30

शहरातील करवंद रोडवरील आमदार संपर्क कार्यालयात बुधवारी शिरपूर विधानसभामधील एकूण ३२५ बूथ कमिटीचा आढावा भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र ...

Meeting of BJP workers in Shirpur | शिरपुरात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक

शिरपुरात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक

शहरातील करवंद रोडवरील आमदार संपर्क कार्यालयात बुधवारी शिरपूर विधानसभामधील एकूण ३२५ बूथ कमिटीचा आढावा भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी घेतला. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आमदार काशिराम पावरा, नंदुरबार लोकसभा बुथ रचना संयोजक राजेंद्र गावित, धुळे लोकसभा बुथ रचना संयोजक शैलेंद्र अजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.

संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे सांगितले, स्थानिक बूथ समिती मजबूत करणे गरजेचे आहे. मतदार यादीचे सूक्ष्म परीक्षण करून बूथ समितीतील सदस्यांची निवड करावी. महिलांना, तरुणांना यामध्ये प्राधान्य द्यावे. समाजातील सर्व घटकांतील सक्रिय समावेश होईल याची विशेष काळजी घ्यावी तसेच महिन्याचा शेवटचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रम प्रत्येक बुथमधील सदस्यांनी बघितला पाहिजे़ १५ ऑगस्ट रोजी आपल्या प्रत्येक बुथमध्ये ध्वजारोहण व तिरंगा यात्रा काढण्यात यावी, प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरी भेट देऊन कोरोना लसी संदर्भात चौकशी करावी व शासनाचा विविध योजनाचा लाभ मिळाला की नाही याची पण चौकशी करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले, बूथ अभियान हे भाजपाच्या कार्यप्रणालीचा महत्वपूर्ण भाग असून ज्याने बूथ जिंकला त्याने निवडणुक जिंकली हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सशक्त, मजबूत बूथ समिती करावी व बूथ रचना करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लक्ष घालून पूर्ण करावे, असे आवाहन केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, धुळे जि़प़चे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जि. प़ सदस्य प्रा. संजय पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, संजय आसापुरे, रमण पावरा, विजय पारधी, योगेश बादल, भीमराव ईशी, अ‍ॅड.प्रताप पाटील, भटू माळी, अविनाश पाटील, कैलास पावरा, मंगेश भदाणे, जितेंद्र सूर्यवंशी, सुनील चौधरी, भूपेश परदेशी, जगन टेलर,जगतसिंग राजपूत, भालेराव माळी, रवींद्र भोई, राधेश्याम भोई, मुबीन शेख, बापू लोहार, मनजीत पावरा, देवेंद्र देशमुख, आकाश मराठे, प्रशांत चौधरी, विक्की चौधरी, महेंद्र पाटील, अविनाश शिंपी, अनिल बोरसे, विशाल धनगर, मुकेश पाटील, रवि राजपूत, पप्पू राजपूत, जयपाल राजपूत, शिवदास पावरा, गुलाब राठोड, पिंटू जाधव, चंद्रकांत जाधव, सर्जन पावरा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Meeting of BJP workers in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.