मध्यस्थी पडली जीवावर, तलवारीच्या हल्ल्यात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 22:12 IST2021-03-15T22:12:28+5:302021-03-15T22:12:54+5:30

देवपुरातील घटना : ३ जणांना दुखापत, ४ जणांविरुद्ध गुन्हा

The mediator fell on Jiva, wounded in a sword attack | मध्यस्थी पडली जीवावर, तलवारीच्या हल्ल्यात जखमी

मध्यस्थी पडली जीवावर, तलवारीच्या हल्ल्यात जखमी

धुळे : दोन जणांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका टेलर व्यावसायिकाच्या जीवावर बेतली आहे. त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता देवपुरात घडली. जखमी अवस्थेत टेलरसह तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर देवपूर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी फिर्याद दाखल झाली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

मेहबूबखान अहमदखान आणि शोएब अली शकील अली यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाले होते. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी देवपुरातील मरीमाता भिलाटीजवळील मरिमाता मंदिराजवळ राहणारे जफर शेख गफार (५९) हे मध्यस्थी पडले होते. पेटलेला वाद शमत असतानाच जफर शेख यांच्या टाइम टेलर दुकानात शिरून त्यांना शिवीगाळ करीत तलवारीने हल्ला चढविण्यात आला. यात त्यांच्या डोक्याला, उजव्या हाताला दुखापत झाली, तसेच त्यांच्यासोबत शोएब अली शकील अली आणि शहबाज जफर शेख (सर्व रा. मरिमाता भिलाटीजवळ, देवपूर, धुळे) हे दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. जखमी अवस्थेत तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जफर शेख गफार यांनी देवपूर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी २ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मेहमूदखान अहमदखान, नासीरखान अहमदखान, फिरोजखान अहमदखान, साजीदखान अहमदखान (सर्व रा. गल्ली नंबर ६, देवपूर) यांच्या विरोधात ३२६, ३२३, ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेडकॉन्स्टेबल आय. एन. ईशी घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: The mediator fell on Jiva, wounded in a sword attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.