अर्थे : अर्थे गावात मागील एक महिन्यापासून लहान मुलांना डेंग्यूसारख्या आजाराची लागण झाली असून, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
अर्थे गावात कोरोनाची परिस्थिती नियंत्रण येत नाही तोपर्यंत गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य विभागाचे डेंग्यूसदृश आजाराच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. यासाठी गावात डेंग्यूसारख्या आजाराच्या नियंत्रणासाठी गावात फवारणी व इतर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे एक महिन्यापासून लहान मुलांना डेंग्यूसारख्या आजाराची लागण झाली आहे. दोषी असलेल्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक गुजर यांनी केलेली आहे.